Ind vs Aus : लवकरच मैदानात उतरणार; मालिकेच्या तारखा जाहीर

0
262

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आयपीएल आणि टी-२० वर्ल्ड कपचं भवितव्य अजूनही अंधारात आहे. त्यातच आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. या दौऱ्यामध्ये टीम इंडिया डे-नाईट टेस्ट मॅचदेखील खेळणार आहे.

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका क्रिकेट जगतालाही बसला होता. गेल्या दोन महिन्यापासून एकही आंतरराष्ट्रीय सामना अद्याप खेळवण्यात आलेला नाही. मात्र स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आयसीसीने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वर्षाअखेरीस भारताविरुद्ध कसोटी मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं.

२०२०-२१ सालासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपलं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं, ज्यात भारताविरुद्ध टी-२० आणि वन-डे मालिकेच्या तारखाही जाहीर करण्यात आलेल्या आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-२० सीरिज, टेस्ट सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळवली जाईल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी-२० सीरिज झाल्यानंतर टी-२० वर्ल्ड कप होईल, यानंतर टेस्ट सीरिज आणि मग वनडे सीरिज खेळवली जाईल. भारत ऑस्ट्रेलियामध्ये ३ टी-२०, ४ टेस्ट आणि ३ वनडे मॅचची सीरिज खेळेल.

ल्या ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमधली पहिली मॅच ३ डिसेंबरपासून ब्रिसबेनमध्ये सुरू होईल. तर दुसरी टेस्ट मॅच डे-नाईट असेल, ही टेस्ट ऍडलेडमध्ये ११ डिसेंबरला सुरू होणार आहे.

भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक

टी-२० मालिका –

पहिला टी-२० सामना, ११ ऑक्टोबर – ब्रिस्बेन
दुसरा टी-२० सामना, १४ ऑक्टोबर – कॅनबेरा
तिसरा टी-२० सामना, १७ ऑक्टोबर – अ‍ॅडलेड

कसोटी मालिका –

पहिली कसोटी, ३ डिसेंबर – ब्रिस्बेन
दुसरी कसोटी, ११ डिसेंबर – अ‍ॅडलेड
तिसरी कसोटी, २६ डिसेंबर – मेलबर्न
चौथी कसोटी, ३ जानेवारी – सिडनी

वन-डे मालिका –

पहिला वन-डे सामना, १२ जानेवारी २०२१ – पर्थ
दुसरा वन-डे सामना, १५ जानेवारी, २०२१ – मेलबर्न
तिसरा वन-डे सामना, १७ जानेवारी २०२१ – सिडनी