India vs England 2021: पहिल्या २ टेस्ट सामन्यांसाठी इंग्लंड आणि भारतीय संघाची घोषणा

0
444

इंग्लंडबरोबर खेळल्या जाणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 19 जानेवारी रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आता इंग्लंडच्या संघानेही दोन कसोटी सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू बेन स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर संघात परतला आहे. पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर जोस बटलर इंग्लंडला परत येईल आणि दुखापतीमुळे ओली पोपच्या जागी त्याची जागा घेतली जाईल.

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. चेतन शर्मा यांच्या नेतृत्त्वाखालील निवड समितीने संघाची घोषणा केली आहे.

भारत आणि इंग्लंड संघांमध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका, पाच ट्वेण्टी 20 सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. तर 28 मार्च रोजी शेवटच्या एकदिवसीय सामन्याने इंग्लंडचा भारत दौरा आटोपणार आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका वेळापत्रक

  • पहिला सामना : 5 ते 9 फेब्रुवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • दुसरा सामना : 13 ते 19 फेब्रुवारी, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
  • तिसरा सामना : 24 ते 28 फेब्रुवारी, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • चौथा सामना : 4 ते 8 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद

भारत विरुद्ध इंग्लंड ट्वेण्टी-20 मालिका वेळापत्रक

  • पहिला सामना : 12 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • दुसरा सामना : 14 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • तिसरा सामना : 16 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • चौथा सामना : 18 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद
  • पाचवा सामना : 20 मार्च, मोटेरा स्टेडियम, अहमदाबाद

भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिका वेळापत्रक

  • पहिला सामना : 23 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
  • दुसरा सामना : 26 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे
  • तिसरा सामना : 28 मार्च, महाराष्ट्र किक्रेट असोसिएशन स्टेडियम, गहुंजे

भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धिमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर आणि अक्षर पटेल.

इंग्लंड संघ : जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जॅक क्रोली, बेन स्टोक्स, टेन लॉरेन्स, जॅक लीच, डोम सिब्ली, बेन फॉक्स, ऑली स्टोन, ख्रिस वॉक्स