IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडिया जाहीर; अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची धुरा!

0
668

बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडचा संघ दोन कसोटी सामन्याच्या आणि टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येत आहे. बीसीसीआयनं न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे विराट कोहलीच्या अनुपस्थित कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दोन्ही टीममधील कसोटी मालिकेतील पहिला सामना 25 नोव्हेंबरपासून कानपूरमध्ये तर दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून मुंबईत खेळवला जाणार आहे. बीसीसीआयनं कॅप्टन विराट कोहलीला पहिल्या कसोटीसाठी तर रोहित शर्माला संपूर्ण मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत उपकर्णधार रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. 25 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला कसोटी सामना कानपूरमध्ये होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना मुंबईत होणार आहे. 3 डिसेंबरपासून मुंबई येथे होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली कर्णधारपदाची सुत्रं सांभाळणार आहे.

ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत वृद्धिमान साहा यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल, तर केएस भरत या मालिकेतील दुसरा यष्टीरक्षक असेल. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी तो पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक होता.

श्रेयस अय्यरला लॉटरी
न्यूझीलंड विरोधातील कसोटी मालिकेसाठी बीसीसीआयने तब्बल पाच वर्षांनंतर जयंत यादवला संघात संधी दिली आहे. जयंतने शेवटची मालिका 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. याशिवाय दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर असलेल्या श्रेयस अय्यर आणि आयपीएलमधील प्रसिद्ध गोलंदाज कृष्णा यांना पहिल्यांदाच कसोटी संघात संधी देण्यात आली आहे.

पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ –

अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेअस अय्यर, वृद्धिमान साहा(यष्टीरक्षक), के. एस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जाडेजा,आर.अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

टी-20 मालिकेसाठी संघ यापूर्वीच जाहीर
बीसीसीआयने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा मंगळवारी केली होती. टी-ट्वेन्टीच्या टीमचं कर्णधारपद रोहित शर्माकडे तर उपकर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे सोपवण्यात आलीय. या मालिकेसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

भारताचा टी-20 संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकिपर), ईशान किशन, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, अवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज