IND vs ENG : भारताचा इंग्लंडवर १० विकेटने दणदणीत विजय

0
206

भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माने 25 आणि शुभमन गिलने 15 रन केले. भारताने १० विकटने तिसरा सामना जिंकत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना २ दिवसात संपला आहे. दुसर्‍या डावात भारताला विजयासाठी 49 धावांची गरज होती. भारताने फक्त 7.4 ओव्हरमध्ये ते पूर्ण केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

अक्षरच्या सामन्यात ११ विकेट

इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावातही निराशा केली. अक्षरने पहिल्याच षटकात झॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टो यांना खातेही न उघडता माघारी पाठवले. त्यानेच मग डॉम सिबली (७) आणि कर्णधार जो रूट (१९) यांनाही बाद केले. अश्विनने बेन स्टोक्स, ऑली पोप आणि जोफ्रा आर्चर यांना बाद करत कसोटी कारकिर्दीत ४०० विकेट पूर्ण केल्या. अखेर इंग्लंडचा दुसरा डाव ८१ धावांत आटोपला. या डावात अक्षरने ३२ धावांत ५ गडी बाद केले. भारताला सामना जिंकण्यासाठी ४९ धावांचे आव्हान मिळाले. रोहित शर्माने नाबाद २५, तर शुभमन गिलने नाबाद १५ धावांची खेळी केल्याने भारताने ४९ धावांचे लक्ष्य एकही विकेट न गमावता गाठले. सामन्यात ११ विकेट घेणाऱ्या अक्षरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

रविचंद्रन अश्विनचे ४०० विकेट पुर्ण

रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 26 धावा देऊन 3 विकेट घेतले. तर दुसऱ्या डावात 48 धावा देऊन 4 विकेट घेतले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील 400 विकेटही पूर्ण केले. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या डावात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ११२ धावा केल्या. ज्यामध्ये जॅक क्रॉलीने सर्वाधिक 53 धावा केल्या. दुसऱ्या डावात संपूर्ण टीम 81 धावांवर बाद झाली. पहिल्या डावातही टीम इंडिया काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरली, यजमानांनी इंग्लंडविरुद्ध 33 धावांची आघाडी घेतली. केवळ रोहित शर्माने मोठा डाव खेळला आणि शानदार 66 धावा केल्या. दुसर्‍या डावात भारताला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.