ND Vs AUS : बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा ऑस्ट्रेलियावर ‘अजिंक्य’ विजय

0
187

अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने मेलबर्नवर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ८ विकेट्सनी धुव्वा उडवला. या विजयाने पहिल्या कसोटी सामन्यातील लाजीरवाण्या पराभवाचा वचपा काढला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ऑस्ट्रेलियाने भारताला ७० धावांचे माफक आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान भारताने २ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

दरम्यान या कसोटी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच भारताचं वर्चस्व राहिलं. पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांन ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं जसप्रीत बुमराने चार, आर अश्विनने तीन, मोहम्मद सिराजने दोन आणि रवींद्र जडेजाने एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 195 धावांमध्ये गुंडाळलं.

यानंतर भारतीय फलंदाजांनी आपल्या पहिल्या डावात चांगली कामगिरी केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रहाणे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 326 धावा करत ऑस्ट्रेलियावर 131 धावांची आघाडी मिळवली.

ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावाची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाचे सहा फलंदाज माघारी परतले होते. मग पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन यांच्या 57 धावांच्या भागीदारी रचली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला काहीशी झुंज दिल्यानंतर पॅट कमिन्स आणि कॅमरुन ग्रीन माघारी परतले आणि ऑस्ट्रेलियाला 200 धावांमध्ये गुंडाळण्यात भारताला यश आलं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाकडे 69 धावांची आघाडी असल्यामुळे भारताला विजयासाठी 70 धावांचं लक्ष्य मिळालं. ते भारताने आठ विकेट्स राखून पार केलं.

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची पाचवी वेळ

गेल्या २० वर्षांपासून भारताने ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण २४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील पहिल्या २३ सामन्यात अवघ्या चार सामन्यात भारताला विजयी पताका झळकावता आली होती. मात्र ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामना जिंकत भारताने अजून एका विजयाची भर पाडली आहे. तर तब्बल १२ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला नमवले आहे आणि उर्वरित ६ सामने अनिर्णित राहिले आहेत