प्रतीक्षा संपली: आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर; चेन्नई-मुंबई संघात सलामीचा सामना

0
382

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याच पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालंय. या वेळापत्रकानुसार गतविजेते मुंबई इंडियन्स आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्स संघांदरम्यान 19 सप्टेंबरला अबुधाबीत सलामीचा सामना रंगणार आहे. तसेच, फायनल 10 नोव्हेंबर म्हणजेच मंगळवारी असेल. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा फायनल रविवारऐवजी मंगळवारी होत आहे.

ही स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 53 दिवस चालेल. 10 नोव्हेंबरला आयपीएल फायनल होईल. यावेळी आयपीएलचे 10 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) खेळले जातील.

आयपीएलमध्ये एकूण 10 डबल हेडर सामने होतील. भारतीय समयानुसार पहिला सामना दुपारी 3:30 वाजता तर दुसरा सामना 7:30 वाजता सुरु होईल. आयपीएलच्या 13 व्या सीजनचा पहिला डबल हेडर सामना 3 ऑक्टोबर 2020 होणार आहे.

यूएईत कुठल्या शहरात आयपीएलचे किती सामने?

यूएईतल्या शारजाह, दुबई आणि अबुधाबी या शहरांमध्ये आयपीएलचे सामने

आयपीएलचे एकूण साखळी सामने – 56

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई – 24 सामने

शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी – 20 सामने

शारजाह क्रिकेट स्टेडियम – 12 सामने