IPL Auction 2021 Live : 292 खेळाडू; लिलावापूर्वी कोणत्या संघात किती खेळाडू, किती खेळाडूंची गरज?

0
271

आयपीएल 2021 (Ipl 2021) च्या हंगामासाठी आज चेन्नईमध्ये लिलाव होणार आहे. या लिलावात जवळपास 292 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये बीसीसीआय (BCCI) आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने (IGC) दुपारी 3 वाजता हा लिलाव होणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अनेक मोठ्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. त्यामुळे या लिलावात (Auction) सर्वच टीम खेळाडूंची खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत.

प्रत्येक टीममध्ये जास्तीत जास्त 25 खेळाडूच ठेवता येणार आहेत. यामध्ये कमाल परदेशी 8 खेळाडूच ठेवता येणार आहे. या निमित्ताने कोणत्या फ्रँचायजीकडे किती रक्कम आहे, तसेच त्यांना या लिलावातून किती खेळाडू हवे आहेत, तर आधीपासून किती खेळाडू आहेत. ही आकडेवारी आपण जाणून घेणार आहोत.

१) मुंबई इंडियन्स
गत विजेत्या ठरलेल्या मुंबईकडे एकूण 18 खेळाडू आहेत. यामध्ये एकूण 4 विदेशी खेळाडू आहेत. म्हणजेच मुंबईला या लिलावातून एकूण 7 खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. मुंबई त्यापैकी 4 परदेशी खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेणार आहे.

खेळाडूंची संख्या : 18

परदेशी खेळाडूंची संख्या : 04

शिल्लक खेळाडूंची जागा : 07

परदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 04

मुंबईकडे असलेली रक्कम – 15 कोटी 35 लाख

२)कोलकाता नाईट रायडर्स (KKR)

खेळाडूंची संख्या : 17

विदेशी खेळाडूंची संख्या : 06

शिल्लक जागा : 08

विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 02

शिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये

३)पंजाब किंग्स (Punjab Kings)
खेळाडूंची संख्या : 16
विदेशी खेळाडूंची संख्या : 03
शिल्लक जागा : 09
विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 05
शिल्लक रक्कम: 53.20 कोटी रुपये

४)दिल्ली कॅपिटल्स (DC)
खेळाडूंची संख्या : 17
विदेशी खेळाडूंची संख्या : 05
शिल्लक जागा : 03
विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 01
शिल्लक रक्कम: 13.04 कोटी रुपये

५)चेन्नई सुपर किंग्स (CSK)
खेळाडूंची संख्या : 19
विदेशी खेळाडूंची संख्या : 07
शिल्लक जागा : 06
विदेशी खेळाडूंची शिल्लक जागा : 01
शिल्लक रक्कम: 19.90 कोटी रुपये

६)सनरायजर्स हैदराबाद

खेळाडूंचा एकूण आकडा : 22

परदेशी खेळाडूंची संख्या – 7

एकूण किती खेळाडूंची गरज – 03

शिल्लक रक्कम: 10.75 कोटी रुपये

७)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु
बंगळुरुला आतापर्यंत एकदाही विजेतेपद पटकावता आलेले नाही. यामुळे यावेळेस बंगळुरुला तडाखेदार खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. बंगळुरुकडे एकूण आता 14 खेळाडू आहेत. त्यानुसार त्यांना आणखी 11 खेळाडू हवे आहेत. यामध्ये 3 परदेशी खेळाडूंना घेणं बंधनकारक असणार आहे. बंगळुरुकडे एकूण 35 कोटी 40 लाख रुपये आहेत.

८)राजस्थान रॉयल्स

शिल्पा शेट्टीच्या राजस्थान रॉयल्सकडे एकूण 16 खेळाडू आहेत. त्यानुसार त्यांना 9 खेळाडूंची गरज आहे. त्यापैकी 3 खेळाडू हे परदेशी असतील. राजस्थानकडे असलेली रक्कम ही 15 कोटी 35 लाख इतकी आहे.