आयपीएल २०२० मध्ये धोनी आणि रोहित शर्माच्या नावावर वेगवेगळे विक्रम

0
274

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आणखी एक रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा धोनी याने सुरेश रैनाला मागे टाकलं आहे. तर मुंबईच्या रोहित शर्मा नेही ५००० धावा करण्याचा टप्पा आयपीएलमध्ये पार केला आहे.

सर्वाधिक सामना’खेळण्याचा’ माहीचा विक्रम’
दुबईमध्ये काल सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नईचा सामना झाला’. महेंद्रसिंह धोनीचा हा आयपीएलमधील 194 वा सामना होता. या सामन्याआधी धोनीने आयपीएलमध्ये एकूण 193 सामन्यांमध्ये 4476 धावा केल्या आहेत. सुरेश रैनाने आतापर्यंत एकूण 193 सामने खेळले असून त्याने 5368 धावा केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी आणि रैना चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सदस्य आहेत. २०१६ आणि २०१७ या दोन हंगामात चेन्नई संघावर कारवाई करण्यात आली होती. ज्यावेळी धोनी पुणे संघाकडून तर रैना गुजरातकडून खेळला. मात्र यंदाच्या हंगामात रैनाने खासगी कारणांमुळे माघार घेतलेली असल्यामुळे धोनीला आपल्या जवळच्या मित्राचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावलं आहे.

रोहित शर्माचे आयपीएलमध्ये 5 हजार रन
आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अखेरीस अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या २ धावांची गरज होती.अबुधाबी येथे किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहितने हा विक्रम साकारला. त्यांच्याआधी फक्त दोन फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. डावाच्या दुसर्‍या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर त्याने फोर मारत आयपीएलमध्ये 5000 रन पूर्ण केले. रोहित शर्मा आयपीएलच्या इतिहासात 5000 धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या अगोदर फक्त विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे.
रोहितने आयपीएलच्या 192 व्या सामन्यात 5000 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 37 अर्धशतके झळकावली आहेत.