IPL 2020 : अजून अर्धे आयपीएल सामने बाकी; प्लेऑफसाठी होणार चुरस

0
198

युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएलच्या १३वा हंगाम अर्धा झाला आहे. स्पर्धेतील पहिला टप्पा पूर्ण झाला असून प्रत्येक संघाचे ७ सामने झाले आहेत. आतापर्यंतच्या स्पर्धेत नेहमीप्रमाणेच बहुतेक मॅच या रोमांचक झाल्या आहेत. यंदाच्या मोसमातल्या बहुतेक मॅच या शेवटच्या बॉलला संपल्या आहेत, तर काही मॅचचा निकाल सुपर ओव्हरमध्येही लागला आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वांत खराब कामगिरी आतापर्यंत चेन्नई सुपरकिंग्सची झाली आहे. चेन्नई (Chennai Super Kings) च्या टीमने आतापर्यंत त्यांनी खेळलेल्या प्रत्येक मोसमात प्ले-ऑफ गाठलं आहे. यंदा मात्र त्यांचा प्रवास खडतर सुरू आहे. या वर्षी तो ७ पैकी २ सामन्यातील विजयासह तळातून दुसऱ्या स्थानावर आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) च्या नावावर फक्त एक विजय असून ते अखेरच्या स्थानावर आहेत.

सध्या गुणतक्त्यात गेल्या वर्षाचे विजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) १० गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) तितक्याच गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईची सरासरी + १.३२७ तर दिल्लीची +१.०३८ इतकी आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (Royal Challengers Bangalore) असून त्यांचे देखील १० गुण आहेत पण सरासरी -०.११६ इतकी आहे. या तिनही संघांनी प्रत्येकी पाच विजय आणि दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता नाइट रायडर्स (Kolkata Knight Riders) असून त्यांनी ७ पैकी ४ विजयांसह ८ गुण मिळवले आहेत.

प्लेऑफ साठी चुरस:-

प्लेऑफ (IPL Playoffs) मध्ये पोहोचण्यासाठी किमान १४ गुणांची गरज असते. सध्याच्या गुणतक्त्यावर नजर टाकता मुंबई, दिल्ली आणि बेंगळुरू या संघांना पुढील ७ पैकी दोन सामन्यात विजय मिळवला तरी पुरेसे ठरू शकते. अर्थात अन्य संघांनी जर काही मोठा उलटफेर केला नाही तर १४ गुण मिळवणारा संघ चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर पुढे प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. खरी स्पर्धा प्लेऑफमधील चौथ्या संघासाठी असेल ज्यासाठी कोलताता, हैदराबाद आणि राजस्थान यांच्यात अधिक चुरस होतील. चेन्नई सुपरकिंग्सला यंदा प्लेऑफसाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. प्लेऑफ साठी त्यांना चेन्नईला ७ पैकी ५ ते ६ सामने जिंकावे लागतील.