TOKIYO OLYMPIC : मेरी कॉमचं आव्हान संपुष्टात; भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलग दुसरा विजय ; पीव्ही सिंधूची क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक

0
370

भारताची स्टार बॉक्सर मेरी कोमला 51 किलो वजनी गटात हार पत्करावी लागली आहे. या पराभवामुळे मेरी कोम टोकियो ऑलिम्पिकमधून बाहेर पडलीय. आजच्या या पराभवामुळे तमाम भारतीयांना मोठा धक्का बसला आहे. मेरी कोमकडून सर्वांना पदकाची अपेक्षा होती. 16 व्या फेरीत मेरी कोमचा सामना कोलंबियाच्या इग्रिट लोरेना वॅलेन्सियाशी झावला. यात मेरी कोम 2-3 अशा फरकाने पराभूत झाली.

टोकियो ऑलिम्पिकमधील मेरी कोमचा प्रवास आता थांबला आहे. प्री-क्वार्टर फायनलमध्ये सहा वेळा विश्वविजेती राहिलेल्या मेरी कोमला कोलंबियाच्या खेळाडूकडून 2-3 असा पराभवाचा सामना करावा लागला.

३८ वर्षीय मेरी कोमला जरी हार पत्करावी लागली असली तरी तिने तमाम भारतीयांची मन जिंकली आहे.

बॉक्सर सतीश कुमार क्वार्टर फायनल्समध्ये
बॉक्सिंगमध्येही भारतानं बाजी मारली आहे. 91 किलोग्राम कॅटेगरीमध्ये सतीशनं क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. सतीश कुमारनं जमैकाच्या बॉक्सरला नमवत विजय मिळवला आहे. भारतासाठी सातव्या दिवसाची सुरुवात अत्यंत सकारात्मक झाली आहे. बॉक्सिंमध्येही पदक मिळण्याच्या आसा उंचावल्या आहेत.

भारतीय पुरुष हॉकी संघाचा सलग दुसरा विजय, अर्जेंटीनावर मात करत पुढच्या फेरीत धडक
भारतीय पुरुष हॉकी संघानं अर्जेंटीनावर मात करत 3-1 अशा फरकानं विजय मिळवला आहे. भारतानं अर्जेंटीनासारख्या मजबूत संघाला पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाकडून विजयाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

पीव्ही सिंधूची क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक, पदक मिळण्याची आशा
भारताच्या पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मियावर मात करत क्वॉर्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे भारताला पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.