इंग्लंडविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताने दहा गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसऱ्याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५*) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने पहिल्या डावात 38 धावा देऊन 6 विकेट घेत इंग्लंडला घाम फोडला. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दुसर्या डावात त्याने 32 धावा देत 5 विकेट घेतले. अशा प्रकारे त्याने या सामन्यात 11 विकेट घेतले.
भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या अक्षर पटेलला सामनावीर घोषित करण्यात आले. विराटने तर त्याची चक्क गुजराती भाषेत स्तुती केली. मात्र विराटचं गुजराती ऐकून हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेलला हसू आवरलं नाही.
हार्दिक पांड्या अक्षर पटेलची मुलाखत घेत होता. घरच्या मैदानावर खेळताना कसं वाटतं? नक्की काय भावना असते? या साऱ्या गोष्टींबद्दल अक्षरनेही चांगली उत्तर दिली. मुलाखत संपवण्याची वेळ आली तेव्हा अचानक विराट कोहली मैदानाच्या एका ठिकाणाहून चालत आला आणि गुजराती भाषेत अक्षरला म्हणाला, “ए बापू थारी बॉलिंग कमाल छे!” विराटची बोलण्याची पद्धत आणि लहेजा ऐकून हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल दोघेही हसून हसून लोटपोट झाले.
DO NOT MISS: @hardikpandya7 interviews man of the moment @akshar2026.👍👍 – By @RajalArora
P.S.: #TeamIndia skipper @imVkohli makes a special appearance 😎@Paytm #INDvENG #PinkBallTest
Watch the full interview 🎥 👇 https://t.co/kytMdM4JzN pic.twitter.com/QLJWMkCNM5
— BCCI (@BCCI) February 26, 2021