क्रिकेटला गुडबाय: पार्थिव पटेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती

0
268

भारतीय संघाचा विकेटकीपर पार्थिव पटेलने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून (कसोटी, वनडे, टी-20) संन्यास घेतला आहे. त्याची क्रिकेटमध्ये 19 वर्षांचे करिअर होते. पार्थिवने 2002 मध्ये 17 वर्षे 153 दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. यासह, तो यष्टिरक्षक म्हणून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

३५ वर्षीय पार्थिव पटेलने आतापर्यंत २५ कसोटी, ३८ वन-डे आणि दोन टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. भारतीय संघाकडून पार्थिवला फारशी संधी मिळाली नसली तरीही स्थानिक क्रिकेटमध्ये पार्थिवने गुजरातचं १९४ सामन्यांमध्ये प्रतिनिधीत्व केलं आहे. २००२ साली वयाच्या १७ व्या वर्षी पार्थिव पटेलने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

पार्थिव पटेल याने २००२ मध्ये इंग्लंड दौर्‍यावर वयाच्या १७ व्या वर्षी टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावर्षी आयपीएलमध्ये पार्थिव पटेल आरसीबीचा भाग होता, परंतु त्याला एकही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती.

पार्थिव पटेल याने लिहिले की, “आज मी माझ्या १८ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीला निरोप देत आहे. माझ्यावर विश्वास ठेवताना बीसीसीआयने वयाच्या १७ व्या वर्षी मला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी दिली. बीसीसीआयने ज्या प्रकारे मला सहकार्य केले त्याबद्दल मी नेहमीच आभारी आहे.’ पार्थिवने सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याने भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचे आभार मानले. पार्थिवने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “मी विशेषतः दादाचे आभार मानतो. ते माझे पहिले कर्णधार आहेत. त्यांनी माझ्यावर बराच विश्वास दाखवला.”

फर्स्ट क्लासमध्ये 10 हजारपेक्षा जास्त धावा

  • पार्थिवने 194 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. ज्यात 43.39 च्या सरासरीने 11,204 धावा केल्या आहेत. त्याने फर्स्ट क्लास मॅचमध्ये 27 शतके आणि 62 अर्धशतके केली आहेत. तर लिस्ट A मध्ये त्याने 193 सामने खेळले आहेत. यामध्ये 29.72च्या सरासरीने 5172 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 35 अर्धशतके केली आहेत.
  • 2015-16च्या विजय हजारे ट्रॉफी हंगामात पार्थिव गुजरात संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना जिंकला होता. त्याने अंतिम सामन्यात शतक ठोकले होते.
  • त्याने 5 संघाकडून आयपीएल खेळले होते. यात चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैद्राबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्सचा समावेश होता.