रायसोनी प्रीमियम लीगमध्ये मुलांमध्ये रॉयल ईगल्स,तर मुलींमध्ये डॅशिंग डॉल्फिन संंघ विजेता

0
361
दरवर्षीप्रमाणेच रायसोनी आर्ट्स, कॉमर्स सायन्स कॉलेजच्या वतीने रायसोनी क्रिकेट प्रीमियम सीजन 1 लीगचे आयोजन करण्यात आले होते. स्पोर्ट्सला प्राधान्य देण्यासाठी या प्रीमियम लीग चालू करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या सामन्यांमध्ये मुलांमध्ये रॉयल ईगल्स संंघ विजेता,तर मुलीमध्ये डॅशिंग डॉल्फिन संघ विजेता झाला आहे. वाघोली येथील रायसोनी कॉलेजच्या ग्राउंडवर हा सामना खेळवला गेला. अनेक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे खेळाला अधिक रंगत आली.
शेवटच्या दिवशी रंगलेल्या सामन्यांमध्ये जिंकलेल्या संघाला बक्षीस देण्यासाठी प्रमुख पाहुणे  नटराज सातव, संदीप सातव, राहुल सातव ,रवींद्र सातव लाभले.यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण केले. पुढील वर्षी अशाच उत्साहाने सामना रंगतील असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. तसेच रायसोनी प्रीमियम लीग संस्थापक सुनील रायसोनी व कॉलेजचे डायरेक्टर डॉ. रवींद्र खराडकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ.आरती देशपांडे व सारिका कुलथे , नितीन चौधरी, सचिन चव्हाण ,विशाल ढबालिया ,प्रथमेश केसकर आणि विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी ,रोहन तांबे हा सर्वोत्कृष्ट फलंदाज , आतिश वाल्मिक सर्वोत्कृष्ट गोलंदाज, श्रेयश भदिर्गे मालिकावीर यांना देखील पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.