भारतीय कसोटी संघात कर्णधारपदाची माळ रोहित शर्माकडे; श्रीलंका विरुद्धच्या टी 20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

0
312

विराट कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचं कर्णधारपद रिक्त होतं. त्यामुळे टीम इंडियाचा पुढील टेस्ट कॅप्टन कोण होणार, याबाबतची जोरदार चर्चा ही क्रिकेट वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. टीम इंडियाला कायमस्वरुपी कसोटी कर्णधार मिळाला आहे.बीसीसीआयने रोहित शर्माची टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी निवड केली आहे. त्यामुळे आता यापुढे रोहित शर्माच कसोटी, वनडे आणि टी 20 या तिन्ही फॉर्मेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच टी२० संघाच्या उपकर्णधारपदीही त्याचीच निवड करण्यात आली आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात कसोटी आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही मालिकेसाठी बीसीसीआयने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. भारताच्या कसोटी संघातून अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोघांना डच्चू दिला आहे. दोन्ही खेळाडू गेल्या एक ते दीड वर्षांपासून आऊट ऑफ फॉर्म आहेत. दोघेही खेळपट्टीवर सातत्याने धावांसाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या निवड समितीने कसोटी संघातून या दोघांना वगळलं आहे.

रहाणे आणि पुजाराच्या जागी प्रियांक पांचाळ आणि श्रेयस अय्यरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं जाईल. तर रोहित शर्मासोबत मयंक अग्रवाल किंवा शुभमन गिल सलामीला मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुजाराच्या जागेसाठी हनुमा विहारीदेखील प्रबळ दावेदार आहे. दरम्यान, रवींद्र जाडेजाने टीम इंडियात पुनरागमन केलं आहे.

भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

भारताचा टी-20 संघ : भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान