रोहित शर्मा च्या नावावर दोन विक्रमाची नोंद ;जलदगतीने १००० धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार

0
130

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतानं इंग्लंडला पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाची धुळ चाखली. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 50 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयामुळं रोहित शर्माच्या नावावर दोन मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकणार रोहित शर्मा पहिला कर्णधार ठरला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला सलग 13 सामने जिंकता आले नाहीत.

जलदगतीने १००० धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने  टी-20 सर्वात जलद 1000 धावा करण्याचा विक्रम केला आहे. 1000 हजार धावा पूर्ण करत त्याने माजी कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित स्वस्त:त बाद झाला. मात्र रोहितने 14 चेंडूत 24 धावा केल्या. याच खेळीच्या जोरावर रोहित शर्मा टी-20 मध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

रोहितने या खेळीच्या जोरावर रनमशीन विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. विराट कोहलीने कर्णधार म्हणून टी-20 क्रिकेटमध्ये 30 डावांत 1000 धावांचा टप्पा गाठला होता. मात्र, रोहित शर्माने 29 व्या डावात 1000 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्माने आतापर्यंत 125 टी-20 आतंरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

भारतीय टी-20 संघाचा उत्कृष्ट कर्णधार
दरम्यान, मागील टी-20 विश्वचषकानंतर भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीनं भारतीय टी-20 संघाचा राजीनामा दिला. त्यानंतर रोहित शर्माकडं भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. रोहित शर्मानं कर्णधार म्हणून आतापर्यंत 13 टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्यानं बांग्लादेशविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 4, वेस्ट इंडीजविरुद्ध 3, श्रीलंकाविरुद्ध 3 आणि इंग्लंड एक टी-20 सामना जिंकलाय. रोहितच्या नेतृत्वात भारतीय टी-20 संघानं सलग तीन मालिकेत विरोधी संघाला क्लीन स्वीप दिलं आहे. ज्यात न्यूझीलंड, वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेचा समावेश आहे