Ind vs Aus : सांगलीकर’ स्म्रीती मंधनाने ऑस्ट्रेलियात घडवला इतिहास

0
263
  • विराटनंतर ‘अशी’ कामगिरी करणारी दुसरीच भारतीय
  • शतकी खेळीने रचला विक्रम

एकीकडे दुबईमध्ये आयपीएलचा थरार रंगत असताना दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंनी देखील चोख कामगिरी बजावत यजमानांविरुद्ध आघाडी घेतली आहेत. भारत आणि ऑस्ट्रोलिया महिला क्रिकेट संघांमध्ये क्वीन्सलँड सुरू असलेल्या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशी भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी आघाडी घेतली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मृती मनधनाने शानदार शतक झळकावलं आहे. मनधनाच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिले शतक आहे. तिने 170 चेंडूत 18 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने हे शतक ठोकलं आहे.

मनधनाने एलिसी पेरीवर चौकार मारून आपलं शतक पूर्ण केलं. भारताकडून पिंक बॉल कसोटीत शतक झळकावणारी ती पहिला महिला क्रिकेटर बनली आहे. तर विराट कोहलीनंतर मनधना दुसरी क्रिकेटपटू आहे. कोहलीने 2019 मध्ये कोलकाता कसोटीत बांगलादेशविरुद्ध 136 धावा केल्या.

स्मृती मंधानानं या सामन्यात आपलं पहिलंच कसोटी शतक झळकावलं असून त्यामुळे ती पिंक बॉल टेस्टमध्ये शतक झळकावणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्मृतीनं १७१ चेंडूंमध्ये आपलं शतक साजरं केलं. गुरुवारी पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ थांबला तेव्हा स्मृती शतकाच्या जवळ पोहोचली होती. मात्र, शतक साजरं करण्यासाठी तिला एक दिवसाची वाट पाहावी लागली.

वयाच्या १८ व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या स्म्रीती मंधनाने आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावले होते. हा कारनामा तिने २०१४ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या मालिकेत केला होता. त्यानंतर सलग ७ वर्ष भारतीय महिला संघाला कसोटी क्रिकेट खेळण्यची संधी मिळाली नव्हती. दरम्यान याच वर्षी ७ वर्षानंतर भारतीय महिला संघाला इंग्लंड संघाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत ब्रिस्टलच्या मैदानावर पार पडलेल्या सामन्यात ७८ धावांची खेळी केली होती.

दरम्यान, आपल्या खेळीविषयी बोलताना स्मृतीनं तिच्या तयारीविषयी सांगितलं आहे. “गेल्या तीन महिन्यांपासून मी एक गुलाबी चेंडू माझ्या किटबॅगमध्ये ठेवला आहे. मी त्याच्याकडे अधूनमधून पाहात असे, त्यामुळे मला त्याची सवय झाली”, असं मंधाना म्हणाली. तसेच, “आम्हाला पहिल्या दिवशी फक्त २ सत्रांचा खेळ मिळाला. मी इंग्लंडमध्ये खेळून आले होते. त्यामुळे मला गुलाबी चेंडूने खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. पण तिथे असताना मी फक्त एक गुलाबी कुकाबुरा चेंडू माझ्या खोलीत ठेवला होता. कारण मला माहिती होतं की पिंक बॉल टेस्ट होईल”, असं दखील मंधानानं सांगितलं.