सय्यद मुश्ताक अली टी-२०: महाराष्ट्र आणि मुबंई संघ जाहीर; श्रीशांतचा ही केरळ संघात समावेश

0
495

नुकत्याच बीसीसीआयने भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात रोमांचक सय्यद मुश्ताक अली टी२० स्पर्धेच्या तारखा घोषित केल्या आहेत. १० जानेवारी ते ३१ जानेवारी २०२१ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. ६ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. आगामी सय्यद मुश्ताल अली टी-२० स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपल्या संघाची घोषणा केली असून पुण्याच्या राहुल त्रिपाठीकडे महाराष्ट्राचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. राहुल त्रिपाठीव्यतिरीक्त केदार जाधव, ऋतुराज गायकवाड यांनाही संघात स्थान मिळालं आहे.

असा असेल महाराष्ट्राचा संघ –

राहुल त्रिपाठी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, नौषाद शेख, केदार जाधव, रणजित निकम, अझीम काझी, निखील नाईक (यष्टीरक्षक), विशांत मोरे (यष्टीरक्षक), सत्यजित बच्छाव, तरणजित सिंग धिल्लाँन, शम्सुझ्मा काझी, प्रदीप दधे, मुकेश चौधरी, मनोज इंगळे, दिव्यांग हिंगणकर, राजवर्धन हांग्रेकर, जगदीश झोपे, स्वप्नील गुगले, धनराज परदेशी, सनी पंडीत

  • सय्य्द मुश्ताक अली टी 20 स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 20 सदस्यीय खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या निवड समितीने शनिवारी 26 डिसेंबरला मुंबई संघाची घोषणा केली. आयपीएलच्या हिरो ठरलेल्या सुर्यकुमार यादवला मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा देण्यात आली आहे.
  • मुंबई संघात सूर्यकुमार यादववर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असून या संघात आदित्य तारे, यशस्वी जयसवाल, सरफराज खान, सिद्धेश लाड आणि शिवम दुबे सारखे खेळाडू आहेत. या शिवाय जलद गोलंदाज धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि फिरकीपटूंमध्ये अथर्व अंकोलेकर आणि श्म्स मुलानी यांचा समावेश केला गेला आहे.

असा आहे मुंबई संघ :

सुर्यकुमार यादव ( कर्णधार), आदित्य तरे ( उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, आकर्षित गोमेल, सरफराज खान, सिद्धेश लाड, शिवम दुबे, शुभम रांजणे, सुजित नायक, साईराज पाटील, तुषार देशपांडे, धवल कुलकर्णी, मिनाद मांजरेकर, प्रथमेश डाके, अथर्व अंकोलेकर, शशांक अत्तारडे, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे, आकाश पारकर आणि सुफीयां शेख

  • आयपीएल स्पॉट फिक्सींग प्रकरणी तुरुंगात जाऊन आलेला भारताचा माजी गोलंदाज एस. श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो आहे. आगामी सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी श्रीसंतची केरळच्या संघात निवड झाली आहे. तब्बल ७ वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरणार आहे.
  • दरम्यान युवा संजू सॅमसन केरळच्या संघाचं नेतृत्व करणार असून सचिन बेबी उप-कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. श्रीसंत, सॅमसन, बेबी यांच्याव्यतिरीक्त बसिल थम्पी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, विष्णू विनोद, सलमान निझार, निधेष एम.डी आणि आसिफ के.एम या खेळाडूंनाही संघात स्थान मिळालं आहे.