T20 World Cup 2007: भारतीय क्रिकेटची टी-२० विश्वचषक विजयाची १३ वर्षे

0
298

दक्षिण आफ्रिकेत 2007 साली पार पडलेला टी-20 विश्‍वचषक हा सर्व भारतीय क्रीडा प्रेमींच्या चांगलाच स्मरणात आहे. 24 सप्टेंबर 2007, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या टी-20 विश्‍वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. २४ सप्टेंबर २००७, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुलनेत नव्याने जन्माला आलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान ही दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोरासमोर आले होते. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या मैदानावर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल-हक मैदानावर तळ ठोकून भारताचा विजयाचा घास हिरावण्याच्या तयारीत होता. अखेरच्या षटकात विजयासाठी अवघ्या ६ धावांची गरज असताना मिसबाहने जोगिंदर शर्माच्या गोलंदाजीवर यष्टींमागे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि श्रीशांतच्या हातात चेंडू जाऊन बसल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. भारताच्या पहिल्या टी-२० विश्वचषकाला आज १३ वर्ष पूर्ण झाली आहेत.

२००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्या आयसीसी टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. वेस्ट इंडिजमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातून नामुष्कीरित्या बाहेर पडल्यानंतर, क्रिकेटच्या या सर्वात लहान प्रकारातील विश्वचषकासाठी भारताने आपला युवा संघ पाठवला. सचिन, द्रविड, गांगुली, जहीर अशी वरिष्ठ मंडळी या स्पर्धेत सहभागी होणार नव्हती. अनुभवी खेळाडू म्हणून फक्त वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग संघात होते. कर्णधारपद सुद्धा उण्यापुऱ्या तीन वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दाखल झालेल्या एमएस धोनीच्या हाती सोपवले होते.

पाकिस्तानविरोधात झालेल्या अंतिम सामन्यात गंभीरने दमदार खेळी केली. भारतीय संघाने 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावत 157 धावा केल्या होत्या. गंभीरने 54 चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 75 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघ 19.3 ओव्हरमध्येच ऑल आऊट झाला आणि भारताने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं. 2007 सालचा टी20 विश्‍वचषक.. पाकिस्तानला चार चेंडूत विजयासाठी 6 धावांची गरज.. आणि त्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने फाईन लेगच्या दिशेने मारलेला स्कूपचा फटका. चेंडू आकाशात उंच गेला आणि क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या श्रीशांतने झेल टिपत पहिल्यावहिल्या टी20 विश्‍वचषकावर भारताचे नाव कोरले. त्या फटक्यामुळे पाकिस्तान सामना आणि विश्‍वचषक हरला.

एमएस धोनीचे कल्पक नेतृत्व, अनुभवी खेळाडूंनी स्वीकारलेली जबाबदारी व युवा खेळाडूंच्या सोबतीच्या जोरावर भारत पहिला टी२० विश्वविजेता झाला होता.

इंग्लंडविरोधात युवराजचे सहा षटकार –
पहिल्यावहिल्या टी २० विश्वचषक स्पर्धेत युवराजने सहा चेंडूवर सहा षटकार लगावायचा कारनामा केला होता. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात युवराज मैदानावर आला, तेव्हा अँड्र्यू फ्लिंटॉफ याने त्याला डिवचले, त्यानंतर पुढच्याच षटकात युवराजने स्टुअर्ट ब्रॉड या गोलंदाजाच्या षटकात ‘त्या’ डिवचण्याचा हिशेब चुकता केला आणि ६ चेंडूंवर ६ षटकार लगावले. त्या सामन्यात त्याने १२ चेंडूत अर्धशतक ठोकले होते. ती खेळी त्यावेळी विक्रमी ठरली होती.