इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल म्हणजे ICC नं दशकातील सर्वोत्तम खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या यादीमध्ये (icc awards 2020) टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीनं बाजी मारली आहे. विराटला सर्वात प्रतिष्ठेचा दशकातला सर्वोत्तम खेळाडूसाठी देण्यात येणारा सर गारफिल्ड सोबर्स पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचबरोबर दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू म्हणून देखील विराटचीच निवड झाली आहे.
आयसीसी पुरस्कारांच्या या कालावधीत कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यासह त्याने या काळात सर्वाधिक शतके आणि सर्वाधिक अर्धशतकाही ठोकले आहेत. या दशकात कोहलीच्या फलंदाजीमध्ये 20,396 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 66 शतके आणि 94 अर्धशतकांचा समावेश होता.
विराट कोहलीनं हे संपूर्ण दशक त्याच्या बॅटिंगनं गाजवलं आहे. त्यामुळे एकूण चार गटातील पुरस्कारासाठी (icc awards 2020) त्याला नामांकन मिळाले होते. दशतकातील सर्वोत्तम खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टेस्ट खेळाडू आणि दशकातील सर्वोत्तम वन-डे खेळाडू, दशकातील सर्वोत्तम टी-20 खेळाडू अशा चार गटात विराटला नामांकन मिळालं होतं. त्यापैकी दोन पुरस्कार विराटला मिळाले आहेत. यापूर्वी विराटचा दशकातील तीन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम टीममध्ये समावेश करण्यात आला होता. तीन्ही टीममध्ये समावेश झालेला विराट हा एकमेव खेळाडू आहे.
https://twitter.com/ICC/status/1343477972624416768?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1343477972624416768%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fvirat-kohli-wins-the-sir-garfield-sobers-award-for-icc-male-cricketer-of-the-decade-356504.html
निवड कशी करतात?
खेळाडूची पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन व्होटिंग पद्धत सुरु केली होती. या ऑनलाईन पद्धतीने नामांकन मिळालेल्या आपल्या आवडत्या खेळाडूला मतप्रक्रिया सुरु ठेवली होती. या प्रक्रियेद्वारे पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
धोनीला विशेष पुरस्कार
खेळाडू भावना जपण्यासाठी देण्यात येणाऱ्या दशकातील ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ या पुरस्कारासाठी आयसीसीच्या पॅनलनं टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीची निवड केली आहे. इंग्लंडविरुद्ध 2011 साली झालेल्या टेस्टमध्ये इयान बेलला आऊट झाल्यानंतरही परत बोलवण्याची खिलाडू वृत्ती धोनीनं दाखवली होती. त्याचा ICC नं हा विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला आहे