वीरू बर्थडे स्पेशल :मुलतानचा सुलतान असलेल्या सेहवागचा आज वाढदिवस

0
371

भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने जागतिक क्रिकेटमध्ये धमाकेदार फलंदाजी केली आहे. सेहवाग आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. आक्रमक सलामीवीर म्हणून ओळख असलेला तसेच मुलतानचा सुलतान अशी ख्याती असलेल्या वीरेंद्र सेहवाग सलामीला येऊन गोलंदाजांची हवा टाईट करण्यात एकदम पटाईत होता.

वीरेंद्र सेहवागने आपल्या कारकीर्दीत अनेक ऐतिहासिक डाव खेळले आहेत जे कायमच संस्मरणीय ठरले. सेहवागने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत एकूण 38 शतकं केली आहेत. 1999 मध्ये सेहवागने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. त्या सामन्यात त्याने केवळ 1 धावा केल्या होत्या आणि 3 ओव्हरमध्ये 35 धावा लुटवल्या. पण त्यानंतर सेहवागने मागे वळून पहिले नाही. २० ऑक्टोबर १९७८ साली जन्मलेल्या सेहवागने फलंदाजांची झोप उडवली होती आणि क्रिकेटचे स्वरुप बदलले होते. 14 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये सेहवागने 104 कसोटी सामन्यांमध्ये 49.42 च्या सरासरीने 8586 धावा केल्या, यामध्ये 23 शतकांसह 32 अर्धशतकांचा सहभाग होता. 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये सेहवागने 8273 धावा केल्या. ज्यामध्ये 15 शतकांसह 38 अर्धशतकांचा सहभाग होता.

सेहवागच्या नावावर असा एक विक्रम आहे जो आतापर्यंत कोणालाच मोडता आला नाही. २०११ साली डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात सेहवागने द्विशतक केले. त्याने १४९ चेंडूत २१९ धावा केल्या. यात २५ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. तेव्हा भारताने ४१८ धावा केल्या आणि १५३ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजविरुद्धचे सेहवागचे हे द्विशतक कर्णधारपदावर असताना झाले होते. आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून द्विशतक करणारा ते एकमेव खेळाडू आहे.

सेहवाग बद्दल काही मनोरंजक किस्से आणि रेकॉर्ड:

  • सेहवाग 12 वर्षांचा होता तेव्हा एका क्रिकेट मॅचदरम्यान त्याचा दात तुटला होता, ज्याच्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. मात्र, आईच्या मदतीने त्याने पुन्हा एकदा क्रिकेट खेळायला सुरुवात केली.
  • सेहवागने 2001 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सेहवागचा कसोटी पदार्पण खूप धमाकेदार ठरला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सेहवागने 105 धावा फटकावल्या. सेहवागने सचिनबरोबर 220 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. याच्यानंतर सहाव्या कसोटी सामन्यात सेहवागने सलामी फलंदाज म्हणून पदार्पण केले आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने 84 आणि 106 धावांची खेळी करून टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून आपली जागा मजबूत केली.
  •  2003 मध्ये सेहवागने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये एक अशी खेळी केली जी कदाचित कोणीही विसरू शकले नसतील. मेलबर्न क्रिकेट मैदानावर सेहवागने केवळ 233 चेंडूत 195 धावा फटकावल्या.
  • याच्यानंतर सेहवागने रेकॉर्ड मोडण्याची जणू सुरुवातच केली. 2004 साली सेहवागने पाकिस्तानविरुद्ध मुल्तानमध्ये कसोटीत तिहेरी शतकी खेळी केली होती. टेस्टमध्ये तिहेरी शतक करणारा सेहवाग पहिला भारतीय फलंदाज बनला. या खेळीनंतर सेहवागला ‘मुल्तानचा सुल्तानी असे म्हटले जाऊ लागले. याच्यानंतर 2008 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेन्नई कसोटीत तिहेरी शतकी खेळी केली. या डावात सेहवागने केवळ 304 चेंडूंमध्ये 319 धावा फटकावल्या. सेहवागने केवळ 278 चेंडूत तिहेरी शतक केले.
  • कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद 10 द्विशतकांमध्ये विरुच्या पाच खेळींचा समावेश होतो. विरुने कसोटीत सलग 11 अशी शतकं झळकावली आहेत ज्यात त्याने 150 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.