BCCI कडून महिला आयपीएल संघाची घोषणा; विमेन्स टी-२० चॅलेंज’ स्पर्धा रंगणार

0
356

यूएईमध्ये आयपीएल (IPL 2020) स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेत अनेक चुरशीचे सामने पाहायला मिळत आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचं मनोरंजन होत आहे. मात्र आता क्रिकेटप्रेमींचं दुप्पट मनोरंजन होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) महिलांच्या ‘विमेन्स टी-२० चॅलेंज’ स्पर्धेचं वेळापत्रक जारी केलं असून या स्पर्धेसाठा तीन संघांची घोषणा केली आहे. मिताली राज ,हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्याकडे या तीन संघांच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. हरमनप्रीत कौर सुपरनोव्हासची कर्णधार असेल. ट्रेलब्लेझरची कर्णधार स्मृती मंधाना, तर मिताली राज हिला व्हेलॉसिटी संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही स्पर्धा ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) खेळवली जाणार आहे.

तिन्ही संघात प्रत्येकी १५ सदस्य आहेत. स्पर्धेचा पहिला सामना ४ नोव्हेंबरला सुपरनोवेज आणि व्हेलॉसिटी यांच्यात होणार आहे. ९ नोव्हेंबरला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज, बांगलादेश आणि न्यूझीलंडमधील महिला खेळाडूही भाग घेतील. या सर्व देशांव्यतिरिक्त थायलंडचा नट्टाहाकन चंथममही यात भाग घेणार आहे, जी टी -२० विश्वचषकात अर्धशतक झळकावणारी आपल्या देशाची पहिली क्रिकेटपटू ठरली.

या स्पर्धेसाठी सर्व खेळाडू 22 ऑक्टोबरला यूएईला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यांनतर खेळाडूंना पुढील काही दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सुपरनोवा विरुद्ध वेलोसिटी यांच्यात खेळण्यात येणार आहे. या टी 20 स्पर्धेच्या निमित्ताने कोरोनानंतर पहिल्यांदाच महिला क्रिकेटपटू मैदानात उतरणार आहेत.

असं आहे टी 20 स्पर्धेचं वेळपत्रक

पहिला सामना : सुपरनोवाज विरुद्ध वेलोसिटी, 4 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

दुसरा सामना : वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेझर्स, 5 नोव्हेंबर, दुपारी 3:30 वाजता

तिसरा सामना : ट्रेलब्लेझर्स विरुद्ध सुपरनोवाज – 7 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

फायनल: 9 नोव्हेंबर, संध्याकाळी 7:30 वाजता

असा आहे संघ :-

संघ
सुपरनोवास:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमीमा रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अट्टाप्पट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), शशीकला सिरीवर्धने, पूनम यादव, शकीरा सलमान, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्रकर, आयूषी सोनी, आयाबोंगा खाका आणि मुस्कान मलिक.

ट्रेलब्लेझर:
स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, रीचा घोष, डी हेमलता, नुजत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी इक्सलेस्टोन, नट्टाहाकन चंथम, डेंद्रा डॉटिन, काश्वी गौतम.

व्हेलॉसिटी:
मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, मनाली दक्षिणी, लेह कॅसपेरेक, डॅनियल व्याट, सुने लूस, जहानारा आलम, एम. अनघा