वूमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धा : ट्रेलब्लेझर्सने संघाने पटकावलं विजेतपद

0
245

वूमन्स टी 20 चॅलेंज स्पर्धेच्या ( Womens T20 Challenge 2020) अंतिम सामन्यात ट्रेलब्लेझर्सने (Trailblazers) सुपरनोावजवर (Supernovas)16 धावांनी विजय मिळवला आहे. यासह ट्रेलब्लेझर्सने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं आहे.

विजयासाठी ११९ धावांचे लक्ष्य गाठताना सुपरनोव्हाज ७ बाद १०२ धावाच करू शकला. दीप्ती शर्मा आणि सलमा खातून या फिरकीपटूंपुढे सुपरनोव्हाजचे फलंदाज अपयशी ठरले. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी भरवशाची सलामीवीर चामरी अटापट्टू (६) फार काळ तग धरू शकली नाही. त्यामुळे सुपरनोव्हाजचे दडपण वाढले. हरमनप्रीत कौरला (३०) सुरुवातीपासून मोठे फटके खेळता आले नाहीत. अनुजा पाटील चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात 8 धावांवर रन आऊट झाली. कर्णधार हरमप्रीत कौर 30 धावांवर खेळत होती. मात्र निर्णायक क्षणी सलमा खातूनने हरमनप्रीतला बाद केल. यानंतर याच 19 व्या ओव्हरमध्ये सलामाने पूजा वस्त्राकरला शून्यावर बाद केलं. ट्रेलब्लेझर्सकडून सलमा खातूनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर दिप्ती शर्माने 2 विकेट्स घेत सलमाला चांगली साथ दिली. त्यामुळे सुपरनोव्हाजचा पराभव निश्चित झाला.

सुपरनोवाजने टॉस जिंकून ट्रेलब्लेझर्सला बॅटिंगसाठी भाग पाडले. बॅटिंगसाठी आलेल्या ट्रेलब्लेझर्सची चांगली सुरुवात झाली. कर्णधार स्मृती मंधाना आणि डिंड्रा डॉटीन या सलामी जोडीने संघासाठी 71 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी तोडायला पूनम यादवला यश आले. पूनमने डिंड्राला 20 धावांवर बाद केलं. यानंतर रिचा घोष मैदानात आली. स्मृतीने रिचाच्या साह्याने धावफळक धावता ठेवला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 3० धावा जोडल्या. या भागीदारीदरम्यान स्मृतीने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र ट्रेलब्लेझर्सचा 101 स्कोअर असताना स्मृती 68 धावांवर बाद झाली. स्मृतीने 49 चेंडूत 5 फोर आणि 3 सिक्ससह 68 धावांची खेळी केली. मानधनाच्या अर्धशतकानंतरही राधा यादवने पाच बळी घेतल्याने ट्रेलब्लेझर्स सुपरनोव्हाजविरुद्ध २० षटकांत ८ बाद ११८ धावाच करू शकला. चार षटकांत अवघ्या १६ धावा देत राधाने पाच बळी मिळवले. राधाने डावाच्या अखेरच्या २०व्या षटकात तीन फलंदाज बाद केले.

संक्षिप्त धावफलक

ट्रेलब्लेझर्स : २० षटकांत ८ बाद ११८ (स्मृती मानधना ६८, ड्रियांड्रा डॉटिन २०; राधा यादव ५/१६, शशिकला शिरीवर्धने १/२२) विजयी वि. सुपरनोव्हाज : २० षटकांत ७ बाद १०२ (हरमनपीत कौर ३०, शशिकला शिरीवर्धने १९; सलमा खातून ३/१८, दीप्ती शर्मा २/९, सोफी एस्सेलस्टोन १/२६)

1) राधा यादवने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी करताना पाच बळी मिळवले. या स्पर्धेत    एकूण ८ बळी घेत ती सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. त्यासाठी राधा यादवला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देण्यात आला.

२) स्मृती मानधनाने तीन सामन्यांत १०७ धावा फटकावत यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान मिळवले. आजच्या अर्धशतकी खेळीमुळे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.