(टिकटॉक ला पर्यायी म्हणून देसी अॅप असणाऱ्या ‘चिंगारी’ ला मिळतोय प्रतिसाद)
जेव्हापासून भारतात चिनी अॅप टिक टॉकबद्दल वाद निर्माण झाला होता तेव्हापासूनच या अॅप वर बंदी घालण्याची मागणी जोर धरत होती. याच दरम्यान, भारतात टिक टॉकसारखे भारतीय अॅप येऊ लागले होते. आता, केंद्र सरकारने भारतात टिक टॉक अॅपवर पूर्णपणे बंदी घातली आहे. (Tik-Tok Ban) ‘मित्रों’ या अॅप नंतर आता ‘चिंगारी’ हे अॅप (Chingari App) वेगाने लोकप्रिय होत आहे.
याला टिक टॉकचं देसी व्हर्जन म्हटलं जात आहे. चिंगारी अॅपवर यूजर्स व्हिडिओ डाउनलोड करू शकतात, अपलोड करू शकतात, मित्रांशी चॅट करु शकतात, नवीन लोकांशी संवाद साधू शकतात, कंटेंट शेअर करू शकता आणि फीड्सद्वारे नवीनवीन गोष्टी ब्राउझ करू शकतात.
हे अॅप हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तामिळ आणि तेलगू भाष सपोर्ट करतं. जेव्हापासून हे अॅप लाँच करण्यात आलं आहे तेव्हापासून या अॅपची लोकप्रियता वेगाने वाढली आहे.
नक्की काय आहे चिंगारी अॅप?
चिंगारी अॅप नोव्हेंबर 2018 मध्ये गुगल प्ले स्टोअरवर अधिकृतपणे आलं होतं. पण काही दिवसांपासून भारतात चिनी सामानांचा बहिष्कार करण्याची मागणी जोर धरु लागल्यानंतर चिंगारीच्या डाउनलोडिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. ओडिशाच्या विश्वात्मा नायक आणि कर्नाटकच्या सिद्धार्थ गौतम यांनी हे अॅप डेव्हलप केलं आहे. भारतात तयार केलेलं हे अॅप TikTok ला थेट टक्कर देतंय. चिंगारी अॅपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकतात आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरही करु शकतात. अॅपमध्ये शानदार फीचर्स असून भारतीय भाषांचा सपोर्टही आहे. याशिवाय अॅपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, एंटरटेनमेंट न्यूज, फनी व्हिडिओ, लव स्टेटस, व्हिडिओ साँग असे अनेक फीचर्स आहेत.
टिकटॉक बंद झाल्याने त्याचे भारतातील स्पर्धक खूश आहेत. चिंगारीच्या मुख्य उत्पादन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, चिंगारीचे तासाला १ लाख डाऊनलोड होत आहेत. आता आम्ही सव्र्हरची क्षमता वाढवत आहोत व ही मागणी पूर्ण करणार आहोत. गुगल प्ले स्टोअरवरून ७२ तासांत चिंगारी अॅप ५ लाख युजर्सनी डाऊनलोड केलेय.