गुगलने केले ‘गुगल प्ले-म्यूझिक ॲप’ बंद

0
453

गुगलने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. गुगलने आपलं सगळ्यात लोकप्रिय आणि बऱ्याच काळापासून चर्चेत असलेलं Google Play Music ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने YouTube Music या चॅनलची सुरूवात केली होती. तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट झाली होती की, गुगल प्ले-म्यूझिक ॲप हे ऍप बंद करण्यात येणार आहे. . गुगलने माहिती दिली की गुगल प्ले म्यूझिक ॲपच्या सर्व युजर्सला यानंतर युट्यूब म्यूझिकवर शिफ्ट केले जाईल. मागील काही महिन्यांपासून गुगल युट्यूब म्यूझिक ॲपसाठी नवनवीन फीचर जारी करत आहे.

युट्यूब म्यूझिक ॲपवर शिफ्ट झाल्यानंतर याच ठिकाणी युजर्सला गुगल प्ले म्यूझिक ॲपची प्लेलिस्ट, लायब्ररी आणि म्यूझिक मिळेल. गुगल प्ले- म्यूझिकला ऑॅक्टोंबर २०२० नंतर कोणतेही अपडेट मिळणार नाही. तर डिसेंबर २०२० पर्यंत युजर्सला युट्यूब म्यूझिक ॲपवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया पुर्ण होईल.

आता गुगल प्ले-म्यूझिक ॲपने ऑफिशिअल शट डाऊन केलं आहे. गुगल प्ले-म्यूझिक ॲप ओपन केल्यानंतर ही सर्व्हिस शट डाऊन केल्याचा मॅसेज येतो. गुगल प्ले म्युझिकला YouTube Music मध्ये ट्रॅक्सला मायग्रेट होऊ शकतं. ऍप ओपन केल्यावर Google Play Music वर No Longer Available असं मोठ्या शब्दात मॅसेज येतो.

इथून गूगल प्ले म्युझिकच्या कंटेटला Youtube म्युझिकला ट्रान्सफर करणार आहे. इथे Manage your Data चं ऑप्शन देखील देण्यात येतं आहे.