ISRO चं ऐतिहासिक यश: PSLV-C49 या क्षेपणास्त्राने 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) यशस्वी लाँचिंग

0
260

इस्रोची या वर्षातली श्रीहरिकोटाहून उपग्रह प्रक्षेपणाची पहिली मोहीम दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी उपग्रह पार पडली. PSLV C 49 या प्रक्षेपकाद्वारे EOS -01 हा स्वदेशी उपग्रह अवकाशात पाठवला गेलाय. शेती, वन आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी या उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रांचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर चीनच्या हलचाली या उपग्रहाद्वारे टीपता येणार आहेत. या प्रक्षेपणात पीएसएलव्ही सी ४९ (PSLV C49) रॉकेट आपल्यासोबत ईओएस ०१ (EOS01) हा एक प्राथमिक उपग्रह आणि नऊ इतर व्यावसायिक उपग्रह (Commercial Satellite) अंतराळात सोडले.

भारताच्या PSLV-C49 या क्षेपणास्त्राने 10 उपग्रहांसह (सॅटेलाईट) यशस्वी लाँचिंग केलं. आधी हे लाँचिंग दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार होतं, मात्र नंतर यात सुधारणा करुन 3 वाजून 12 मिनिटांनी लाँचिंग झालं. या प्रक्षेपणाचं ‘काऊंड डाऊन’ शुक्रवारी (6 नोव्हेंबर) दुपारी रॉकेट लाँचिंगसाठी 26 तासांचं काऊंट डाऊन सुरु झालं होतं. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून हे प्रक्षेपण झालं.

PSLVC49 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सुरुवातीला EOS01 हा उपग्रह चौथ्या टप्प्यात यशस्वीपणे क्षेपणास्त्रापासून वेगळा झाला आणि अंतराळ कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आला. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर 9 उपग्रह देखील यशस्वीपणे वेगळे होऊन आपआपल्या कक्षेत स्थिरावले. अशाप्रकारे या मोहिमेत इस्रोचा एक आणि अन्य 9 अशा एकूण 10 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण झालं.

EOS-01’अर्थ ऑब्झर्वेशन रिसेट सॅटेलाईटचं एक आधुनिक प्रकार आहे. याच्या सिंथेटिक अॅपर्चर (SAR)रडारमध्ये कुठल्याही वेळेत आणि कोणत्याही वातावरणात पृथ्वीवर नजर ठेवण्याची क्षमता आहे. हा उपग्रह ढगाळ वातावरणातही पृथ्वीवर नजर ठेवू शकतो. या उपग्रहामुळे भारतीय सैन्याला मोठी मदत होईल. या उपग्रहाच्या सहाय्याने चीनसह सर्वच शत्रू राष्ट्रांवर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे. यासोबत शेती, जंगल आणि पूरसदृश्य स्थितीवरही लक्ष ठेवता येणार आहे.