रियलमीचे नवं स्मार्टवॉच आणि वायरलेस ब्ल्यूटूथ इयरफोन लाँच

0
316

स्मार्टवॉच आणि वायरलेस ब्ल्यूटूथ इयरफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. रियलमीचे नवं स्मार्टवॉच आणि वायरलेस ब्ल्यूटूथ इयरफोन लाँच करणार आहे. रियलमी नवं स्मार्टवॉच आणि वायरलेस ब्ल्यूटूथ इयरफोन लाँच करणार आहे. 23 डिसेंबर रोजी कंपनी आपले दोन नवे प्रोडक्ट Realme Watch S Pro आणि Realme Buds Air Pro Master Edition TWS इयरबड्स लाँच करणार आहे.

रियलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी आपल्या ट्विटरवरून या अपकमिंग प्रोडक्ट्सची माहिती दिली आहे. हे दोन्ही प्रोडक्ट 23 डिसेंबरला दुपारी 12.30 वाजता लाँच केले जाणार आहेत.

रियलमी वॉच S प्रो (Realme Watch S Pro) –

रियलमीने हे लेटेस्ट वॉच पाकिस्तान आणि युरोपमध्ये आधीच लाँच केलं आहे. आता कंपनी युजर्ससाठी या वॉचचं प्रो एडिशन आणणार आहे. रियलमी वॉच S प्रो स्मार्टवॉचमध्ये 1.39 इंची AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. वॉचचं डायल स्टेनलेस स्टील असेल. वॉचच्या उजवीकडे दोन बटण असतील. प्रो मॉडेलमध्ये 15 स्पोर्ट्स मोड्स मिळतील. वॉचमध्ये खास जीपीएस फीचरही असणार आहे.

Realme Watch S Pro मध्ये 14 दिवसांच्या बॅटरी लाईफसह ब्लड ऑक्सिजन आणि हार्ट रेट मॉनिटरिंग फीचर मिळेल. कंपनीने शेअर केलेल्या प्रमोशनल इमेजमध्ये वॉच ब्राउन लेदर स्ट्रॅपमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्याशिवाय या वॉचसोबत ब्लॅक, ऑरेंज आणि ब्लू सिलिकॉन स्ट्रॅपही असतील.

रियलमी बड्स एयर प्रो मास्टर एडिशन –

रियलमी अनेकदा आपल्या हीट प्रोडक्ट्सचं मास्टर एडिशन लाँच करते. कंपनीने आतापर्यंत पॉप्युलर स्मार्टफोन रियलमी X, रियलमी X2 प्रो आणि रियलमी X50 चे मास्टर एडिशन्स लाँच केले आहेत. स्मार्टफोनशिवाय कंपनी पहिल्यांदाच रियलमी बड्स एयर प्रो या इयरफोनचं मास्टर एडिशन लाँच करणार आहे.