खुशखबर : १ जूनपासून रोज २०० नॉन एसी ट्रेन धावणार

0
341

(रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली घोषणा)

गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे भारतीय रेल्वेने प्रवासी वाहतूक बंद ठेवली आहे. रेल्वे सुरू झाल्यापासूनच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेने प्रवासी वाहतूक इतक्या मोठ्या काळासाठी बंद ठेवली आहे. मात्र, आता अखेर ती प्रवासी वाहतूक पुन्हा सुरू होणार असून रेल्वेमंत्र्यांनीच ट्वीटवरून ही घोषणा केली आहे. देशभरात अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांसाठी श्रमिक स्पेशल आणि श्रीमंतासाठी राजधानी स्पेशल सुरु केल्यानंतर आता रेल्वे देशभरात मेल एक्स्प्रेस सुर करणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. १ जूनपासून २०० स्पेशल रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार सोडल्या जातील असं पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्रेन्ससाठीचे ऑनलाइन बुकिंगही लवकरच सुरु होईल असंही गोयल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे.

येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार आहे. या ट्रेन वेळापत्रकानुसार चालवल्या जाणार आहेत, याबाबतचीही माहिती लवकरच दिली जाईल, असं पियुष गोयल यांनी सांगितलं. जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी कामगारांना मदत करावी. कामगारांचं रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असं आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केलं आहे.

राज्य सरकारांनाही पियूष गोयल यांनी एक आवाहन केलं आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित मजुरांना सहकार्य करावं. त्यांच्या जवळ असलेल्या मेनलाइन स्टेशनजवळ नोंदणी सुरु करावी. त्याची यादी रेल्वे अधिकाऱ्यांकडे द्यावी. जेणेकरुन त्यानुसार रेल्वे श्रमिक स्पेशल ट्रेन चालवू शकेल. तसंच जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आपल्या घरी लवकरच जाता येईल. त्यांनी काळजी करु नये असंही पियूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

रेल्वेकडून आतापर्यंत १६०० अधिक श्रमिक विशेष ट्रेन चालण्यात आल्या आहेत. याद्वारे १० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यात आलं आहे. विविध राज्यांमधून या श्रमिक विशेष ट्रेन चालवण्यात येत आहेत.

Thread

See new Tweets

Tweet

Piyush Goyal@PiyushGoyal·श्रमिकों के लिये बड़ी राहत, आज के दिन लगभग 200 श्रमिक स्पेशल ट्रेन चल सकेंगी, और आगे चलकर ये संख्या बड़े पैमाने पर बढ़ पायेगी।4511.5K10KPiyush Goyal@PiyushGoyal·इसके अतिरिक्त भारतीय रेल 1 जून से टाइम टेबल के अनुसार प्रतिदिन 200 नॉन एसी ट्रेन चलायेगा जिसकी ऑनलाइन बुकिंग शीघ्र ही शुरु होगी।5271.3K6.2K