- प्रवासाचा मार्ग ते नोंदणी प्रकिया येथे आहे संपूर्ण माहिती
दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली राहिल्यानंतर येत्या 30 जूनपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु होत आहे. 43 दिवसांची ही यात्रा असणार आहे. या यात्रेसाठी 11 एप्रिलपासून नोंदणी सुरु झाली आहे. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, परंपरेनुसार ही यात्रा रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे.
दोन वर्षांपासून करोना महामारीमुळे ही यात्रा थांबवण्यात आली होती. मात्र, या काळात पवित्र गुहेत बाबा अमरनाथ यांची पूजा पारंपरिक पद्धतीने वैदिक मंत्रोच्चाराने सुरू होती.
अमरनाथ धाम काय आहे आणि त्याचे महत्व काय?
- अमरनाथ धाम म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधील हिमालयाच्या कुशीत वसलेली एक पवित्र गुहा आहे. ही गुहा हिंदूंचे सर्वात पवित्र स्थान आहे.
- अमरनाथ येथील पवित्र गुहेत भगवान शिव बर्फ-लिंगाच्या रूपात विराजमान असल्याची मान्यता आहे.
- बर्फापासून शिवलिंगाची निर्मिती झाल्यामुळे याला ‘बाबा बर्फानी’ असेही म्हटलं जातं.
- ही पवित्र गुहा हिमनद्या, बर्फाळ पर्वतांनी वेढलेली असून फक्त उन्हाळ्यातील काही दिवस वगळता गुहा वर्षभर बर्फाने झाकलेली असते. उन्हाळ्याच्या त्याच दिवसांत गुहा भाविकांना दर्शनासाठी खुली असते.
- विशेष बाब म्हणजे, या गुहेत दरवर्षी नैसर्गिकरित्या बर्फाचे शिवलिंग तयार होते. गुहेच्या छतावर असलेल्या भेगांमधून पाण्याचे थेंब पडतात आणि त्यापासून बर्फाचे शिवलिंग तयार होते. प्रचंड थंडीमुळे पाणी गोठून बर्फ शिवलिंगाचा आकारात येते.
- चंद्र प्रकाशाच्या आधारे कमी-जास्त होणारे हे जगातील एकमेव शिवलिंग आहे. हे शिवलिंग श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पूर्ण होते आणि त्यानंतर येत्या अमावास्येपर्यंत त्याचा आकार लक्षणीयरीत्या कमी होतो. हे दरवर्षी घडते.
दरवर्षी लाखो भाविक अमरनाथच्या पवित्र गुहेत या बर्फाच्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी येतात.
2022 अमरनाथ यात्रेशी संबंधित महत्त्वाच्या बाबी –
- अमरनाथ यात्रा 2022 ची नोंदणी ही येत्या 11 एप्रिलपासून सुरू होईल. तर 30 जून ते 11 ऑगस्टपर्यंत ही यात्रा चालेल.
कोरोना महामारीनंतरची ही पहिली अमरनाथ यात्रा आहे. कोरोना विषाणूचा पादूर्भाव पाहता, सर्व भाविकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे अनिवार्य आहे. - या यात्रेत 13 वर्षांपेक्षा कमी, 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ झालेल्या गर्भवती महिलांना प्रवास करण्याची परवानगी नाही.
- श्राइन बोर्डाने पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर दररोज 10,000 यात्रेकरूंची व्यवस्था करण्याचे मान्य केले आहे. यात हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या संख्येचा समावेश नाही
- यावेळी बालताल ते डोमेल या 2 किमी लांबीच्या प्रवासाच्या मार्गावर मोफत बॅटरी वाहन सुविधेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दलाच्या 250 कंपन्यांचे सुमारे 1 लाख जवान तैनात करण्यात येणार आहेत. यात सीआरपीएफचे जवान प्रमुख असतील.
- अंदाजानुसार, यावेळच्या अमरनाथ यात्रेला 10 लाखांहून अधिक भाविक उपस्थित राहू शकतात.
तुम्ही यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी नोंदणी करू शकता.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :
श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या (jksasb.nic.in) या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.
अशा पद्धतीने नोंदणी करा.
वेबसाईट ओपन करा
नोंदणीवर जा
अॅप्लिकेशन फॉर्म भरा
OTP नंबरने Verify करा
आता तुम्हाला अॅप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज येईल
नोंदणीचे पैसे भरा
तुमची नोंदणी डाऊनलोड करा
नोंदणी शुल्क प्रत्येकी 100 रूपये
ऑफलाईन नोंदणी या बॅंकांतून करू शकता.
पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank)
जम्मू एन्ड काश्मीर बॅंक (Jammu and kashmir Bank)
येस बॅंक (Yes Bank)
कोणते कागदपत्रं लागतील ?
- आधार कार्ड
- 4 पासपोर्ट साईझ फोटो
- सरकारी हॉस्पिटलचे आरोग्य प्रमाणपत्र (Health Certificate).