International Picnic Day: आंतरराष्ट्रीय सहल दिवस का साजरा केला जातो?

0
447

मित्रांनो सहल म्हटले की पहिले आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवतात कारण लहान असताना नेहमी आपल्या शाळेची कुठेतरी ऐतिहासिक तसेच निसर्गरम्य स्थळी सहल जायची.त्यामुळे सहल ही आपणास लहानपणापासुनच माहीत आहे. पण सहल म्हणजे फक्त लहान मुलांची असते असे नाही ती सहल मोठ्यांचीही असू शकते किंवा कुटूंबियांची सुद्धा असू शकते. आज आपण सहल विषयावर बोलत आहे कारण आज १८ जून हा आंतराष्ट्रीय सहल किंवा पिकनिक डे म्हणून साजरा केला जातो. लोक या दिवशी आपल्या प्रियजनांबरोबर बाहेर जाणे आणि दर्जेदार वेळ घालवणे पसंत करतात.

आंतरराष्ट्रीय सहल दिवस का साजरा केला जातो?
दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहल दिवस साजरा करण्याचे मुख्य उददिष्ट म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनातुन वेळ काढुन आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या फँमिलीसोबत एक चांगला वेळ व्यतीत करायला हवा त्यांच्यासोबत बाहेर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सहलीला जायला हवे.

त्यांना आपण आपल्या कामातुन सवड काढुन वेळ द्यावा त्यांच्याशी संवाद साधावा हे सांगण्यासाठी, आपणास आपल्या जीवणातील सहलीचे महत्व पटवुन देण्याकरीता हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो.

आंतरराष्ट्रीय सहल दिवसाचा इतिहास –
● आंतरराष्ट्रीय सहल दिवस हा फ्रान्स ह्या देशात एकोणिसाव्या शतकामध्ये सर्वप्रथम साजरा केला गेला होता.तेव्हापासुन दरवर्षी 18 जुन रोजी हा दिवस साजरा केला जात असतो.

● आंतरराष्ट्रीय सहल दिवस सगळयात प्रथम फ़्रान्स ह्याच देशात साजरा करण्यात आला होता.या दिवशी इथे राहणारे लोक निसर्गाचे सान्निध्य असलेल्या समुद्राकाठी एखाद्या शांत निरव ठिकाणी जातात आणि आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ व्यक्तीत करतात.सोबतच चीज ब्रेड फ्रूटस तसेच वाईन इत्यादींचा आनंद देखील घेतात.

● पिकनिक डे साजरा करणे हे फ्रान्स ह्या देशात फ्रेंच राज्यक्रांतीचा शेवट झाल्यानंतर सुरू झाले फ्रेंच राज्यक्रांती संपुष्टात आल्यानंतर पहिल्यांदाच येथील जनतेसाठी राँयल नावाचे गार्डन सुरू करण्यात आले.त्यानंतर फ्रेंच देशातील लोक आपल्या फँमिलीसोबत येऊन वेळ व्यतीत करू लागले घरून स्वयंपाक तयार करुन गार्डनमध्ये जाऊन गप्पागोष्टी करत खाऊ पिऊ लागले तेव्हापासुन ही इथली प्रथाच बनुन गेली.

पण आता हाच दिवस फ्रान्स व्यक्तीरीक्त संपुर्ण जग देखील हळुहळु मान्य करू लागले आहे म्हणुनच भारत देशात तसेच जगभरात दरवर्षी 18 जुन रोजी हा दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा केला जाऊ लागला आहे.

तर काय तुम्ही पण करणार पुढच्या वर्षीपासून हा दिवस साजरा. सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये अशी एक सुंदर सहल किंवा पिकनिक हवीच. तुम्हाला सर्वांना आंतराष्ट्रीय पिकनिक दिवसाच्या शुभेच्छा