हिवाळा ऋतू आता खऱ्या अर्थाने देशात स्थिरावू लागला आहे. उत्तर भारतात सातत्याने तापमानाचा पारा खाली जात असून दिल्लीपासून जम्मू-काश्मीरपर्यंत याचे परिणाम दिसत आहेत. उत्तरेकडे आलेली ही थंडीची लाट राज्यावरही परिणाम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, नागपूर, कोल्हापूर या भागांसह मुंबईतही तापमानाचा आकडा खाली गेला आहे. राज्यात आलेली ही थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
थंडीची मजा लुटण्यासाठी गिरिस्थानांवर गर्दी
राज्यात आलेली ही थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर आणि कोरोना काळातील अनलॉकच्या या टप्प्यात आता थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा या भागांमध्ये अनेक ठिकाणी शहराकडून जाणारी गर्दी वाढल्याचं दिसत आहे. मुख्य म्हणजे कोरोनाचं संकट पाहता या भागांमध्ये शक्य त्या सर्व परिंनी काळजी घेण्यात येत असून, पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिक आपली जबाबदारी पार पाडत असल्याचंही पाहायला मिळत आहे.
पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा या भागांमध्ये अनेक ठिकाणी शहराकडून जाणारी गर्दी वाढल्याचे दिसत आहे. मुख्य म्हणजे कोरोनाचे संकट पाहता या भागांमध्ये शक्य तितकी काळजी घेण्यात येत असून , पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिक आपली जबाबदारी पार पाडत आहेत.
दरम्यान, उत्तरेकडील कोरड्या आणि थंड वाऱ्यांमुळे जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि त्तराखंडमधील काही उंच प्रदेशांवर बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुण्यात 11.5 अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून महाबळेश्वरमध्ये 14.3 अंश सेल्शिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)
- अंबाझरी (बुलढाणा)
- आंबोली (सिंधुदुर्ग)
- कोयनानगर (सातारा)
- खंडाळा (पुणे)
- चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
- अंबाजोगाई (बीड)
- जव्हार (पालघर)
- तोरणमाळ (नंदुरबार)
- पन्हाळा (कोल्हापूर)
- पाचगणी (सातारा)
- पाल -रावेर (जळगाव)
- भीमाशंकर (पुणे)
- महाबळेश्वर (सातारा)
- माथेरान (रायगड)
- मोखाडा(पालघर)
- म्हैसमाळ (औरंगाबाद)
- येडशी (उस्मानाबाद)
- रामटेक (नागपूर)
- लोणावळा (पुणे)