एक चांगला अभिनेता आपल्यातून हरपला; अभिनेते इरफान खान यांचं निधन

0
399

बॉलिवूडमधले प्रसिद्ध अभिनेते इरफान खान यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी निधन झाले आहे. इरफान खान यांना न्यूरोएंडोक्राइन ट्यूमरचा आजार होता. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अचानक निधनानं बॉलिवूडसह जगभरातील त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. २०११मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. त्यांचा गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा सुरू होता. त्याचसाठी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचं देखील निधन झालं होतं. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून त्यांचं अंतिम दर्शन घेतलं होतं. मात्र, आता खुद्द इरफान खान यांच्याच निधनाच्या वृत्तामुळे चित्रपट सृष्टीवर दु:खाची अवकळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे एक अष्टपैलू अभिनेता हरपल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी त्याची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान आईला शेवटचं पाहायलाही जाऊ शकला नाही. आईचं अंत्यदर्शनही त्याला व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला शेवटचं पाहता आलं नाही ही सल त्याच्या मनात होती.

जवळपास 30 वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ हे त्याचे निवडक गाजलेले चित्रपट आहेत. त्याला हासिल (निगेटिव्ह रोल), ‘लाइफ इन अ मेट्रो’ (सर्वकृष्ट अभिनेता), ‘पान सिंह तोमर’ (सर्वकृष्ट अभिनेता) आणि ‘हिंदी मीडियम’ (सर्वकृष्ट अभिनेता) साठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘पान सिंह तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्काराने त्याला सन्मानित करण्यात आले होते. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी 2011 मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

मूळचे जयपूरचे असलेले इरफान खान यांनी दिल्लीच्या एनएसडी अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रगल करून आपलं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. पान सिंह तोमर या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

सर्वात दुर्देवी म्हणजे या लाडक्या अभिनेत्याचे शेवटचे दर्शनही लॉकडाउनमुळे घेता येणार नाही आहे. एवढ्या चांगल्या अभिनेत्याचा शेवट असा होईल ही खूपच धक्कादायक गोष्ट आहे.

या लाडक्या अभिनेत्याला देसीडोकं कडून भावपूर्ण श्रद्धांजली. इरफान खान सर तुम्ही सदैव तुमच्या चित्रपटातून आमच्या सोबत असाल.