ग्रामपंचायतचा इतिहास आणि त्यांचे कार्य काय आहेत?

0
688

पूर्वीपासून चालत आलेली ग्रामविकासाची मुख्य आधारस्तंभिका म्हणजे ग्रामपंचायत. गावात राहणाऱ्या रहिवाशांची आर्थिक,सामाजिक, सांस्कृतिक वाढीची तसेच योग्य वेळेस त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी हि ग्रामपंचायतीवर असते.

अशा या महत्वाचा ठरणाऱ्या घटकाचा भारतातील जन्म हा ब्रिटिश राजवटीत झालेला आढळतो. प्राचीन काळात ग्रामपंचायतीस समाजमान्य स्थान होते. यामुळे केंद्रीय स्थानी घडणाऱ्या घडामोडींचा गाव पातळीवर फारसा फरक पडत नसे. ब्रिटिशांनी सामाजिक स्वरूप असलेल्या ग्रामपंचायतीस एककेंद्री बनवले. ग्राम पंचायतीस नोकरशाहीचे स्वरूप येऊन गावातील एकाच व्यक्तीला सरकारचे नोकर ठरवण्यात आले.

स्वात्रंत्योत्तर काळात महात्मा गांधीजी आणि समाज घटकांमधून ग्राम पंचायत हा भारतीय राज्यव्यवस्थेचा पाया असावा अशी मागणी करण्यात आली. परंतु तसे केल्यास सामाजिक रूढी, परंपरा यांमध्ये अडकलेल्या ग्रामीण भागात अस्तित्वात असलेला भेदभाव दृढ होऊन दलित वर्गावर अन्याय होण्याची शक्यता असल्याचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नजरेस आणले. यांमुळे ग्राम पंचायतीस प्राथमिक घटकाचे स्वरूप देण्याऐवजी त्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे शासनास सूचित करण्यात आले.

१९५४ सालापासून गावोगावी ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या. काँग्रेस कार्यकाळात डॉ. काटजू समितीच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायती संदर्भात अनेक शिफारशी करण्यात आल्या . याच वेळेस नॅशनल डेव्हलोपमेंटल कौन्सिल अंतर्गत १९५५ मध्ये बळवंतराय मेहता यांच्या अध्यक्षपदी समिती स्थापन करण्यात आली. या नुसार २४ नोव्हेंबर १९५७ रोजी सादर केलेल्या अहवालानुसार तीन स्तराच्या पंचायत राज्याची कल्पना मांडण्यात आली.

२ ऑक्टोबर १९५९ रोजी पहिली पंचायत राज ही राजस्थान मधल्या नागौर जिल्ह्यात राबवली गेली. मेहता समितीच्या अहवालानुसार पंचायती राज्य या संकल्पनेत जिल्हा स्तरावर जिल्हापरिषद, तालुका स्तरावर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्रामपंचायत निर्माण झाली.

ग्रामपंचायतीचे कार्य

कृषी

जमीन सुधारणांची अंमलबजावणी करणे, धान्य कोठारांची निर्मिती करणे, कंपोष्ट खताची निर्मिती करणे, तसेच पडीत जमीन लागवडीखाली आणून पिकांसंबंधी प्रयोग करणे. सुधारित बियाणांच्या् वापराला प्रोत्साहन देणे, शेती अवजारांचे प्रयोग करणे, सुधारीत शेती करण्यासाठी प्रोत्साहीत करणे.

कृषी जमीन सुधारणांची अंमलबजावणी करणे, धान्य कोठारोची निर्मिती करणे, केपोस्ट खताची निर्मिती करणे तसेच जमीन लागवडीखाली आणून पिकांसंबंधी प्रयोग करणे. सुधारीत बियाणांच्या वापराला प्रोत्साहण देणे. शेती अवजारांचे प्रयोग करणे.

पशुसंवर्धन

कार्यक्षेत्रातील पशुधनाची काळज घेणे, संकरित गुरांच्या पैदासासाठी प्रयत्न करणे, दुग्धोंत्पादनात प्रोत्साहन देणे. जनावरासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे.

समाजकल्याण

दारुबंदीस प्रोत्साहन देणे, गावातील जुगार अस्पृंश्यीता नष्ट करण्याकसाठी प्रयत्न करणे, महिला व बालकल्याणाच्या योजना लाभार्थीपर्यंत पोहोचविणे. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणची सोय करणे. ग्रामशिक्षण समितीव्दा्रे गावाचा शैक्षणिक विकास साधणे.

शिक्षण

प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणची सोय करणे. ग्रामशिक्षण समितीव्दा्रे गावाचा शैक्षणिक विकास साधणे.

आरोग्य

गावाच्या आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर आहे. सार्वजनिक विहिरी, गटारे, तसेच गावाचा परिसर स्वच्छ ठेवून साथीच्या रोगांना आळा घालणे. शासनाच्या आरोग्या विषयक योजना गावपातळीवर राबविणे. उदा. लसीकरण सार्वजनिक स्व‍च्छतागृहांची उभारणी, प्रसूती आणि बालसंगोपनाबाबत उपाययोजना करणे. गावातील जनतेस शुध्द पाणीपुरवठा करणे. स्मशान भूमिच्या जागेची व्यवस्था करणे.

रस्ते बांधणी

गावातील रस्ते, पुल, साकव बाधकामे करुन दळणवळणाच्या सोयी करणे, तसेच गटारी, सार्वजनिक बाग, क्रीडांगणे, ग्रामसचिवालये आदींची बांधकामे करणे.

ग्रामोद्योग आणि सहकार

ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देवुन रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे, गावात विविध कार्यकारी सोसायट्या, पतपेढी स्थापन करण्यासाठी पुढाकार घणे.