दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. दसरा विजयचा प्रतीक आहे. या दिवसात वातावरणात आनंद पसरला असतो. झाडांवर फुलं बहरु लागतात. झेंडूचे फुलं जणू हसू लागतात. अशात या सणात झेंडूचे फुलं घरोघरी सजावटीसाठी, पूजेसाठी कामास घेतले जातात. देव पूजा, शस्त्र पूजा, आयुध पूजा तसेच वापरातील यंत्र, वाहनं व प्रवेशद्वारावर सजावटीसाठी झेंडूचा वापर होतो.
झेंडूची फुलेच का महत्त्वाची :
खरं तर यामागील कारण म्हणजे झेंडू सोप्यारीत्या उपलब्ध असणे आहे. आपल्या पिवळ्या आणि केशरी रंगामुळे हे फुलं खास आहेत. या रंगामुळे ते सोनेरी असल्याचे जाणवतं आणि तसेही पिवळा, केशरी किंवा सोनेरी रंग शुभ मानले गेले आहे. झेंडूच्या फुलांचा रंग विजय, हर्ष आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करतं.
या फुलाचं धार्मिक महत्व इतर फुलांपेक्षा अधिक आहे म्हणून विजयाच्या सणावर झेंडूच्या फुलांची सजावट आणि पूजेसाठी हे फुलं वापरण्याचं महत्त्व आहे.
या फुलाला हिरण्यगर्भ पुष्प देखील म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि त्याच्या रंगासारखे फुल म्हणजे झेंडू. झेंडूची फुले इतर फुलांच्या तुलनेत जास्त काळ टिकतात. साधरण दोन ते तीन दिवसही फुले कोमेजत नाही. एकाच रंगामध्ये विविध छटा, लहान-मोठे, टोकदार-पसरट पाकळ्यांचे आकार आकर्षण वाढवतात.
झेंडूच्या फुलाबद्दल माहिती:
झेंडू ही एक शोभेची फुले देणारी औषधी वनस्पती आहे. झेंडूची फुले बहुउपयोगी आहेत. ह्या फुलझाडाची लागवड संपूर्ण भारतात होते. झेंडूचे झाड सुमारे अर्धा ते एक मीटर उंच असते. झेंडूमध्ये पिवळा झेंडू आणि नारिंगी झेंडू हे दोन मुख्य प्रकार आहेत. झेंडूच्या काही जाती मेक्सिकोतून भारतात आल्या आहेत.
औषधी उपयोग
झेंडूची फुले चवीला तिखट, कडू आणि तुरट असतात. ती अपस्मार आकडीत उपयोगी आहेत. झेंडूची पाने मुळव्याध, मूत्रपिंडाची दुखणी आणि स्नायूंच्या दुखण्यावर गुणकारी आहेत. फुलांचा रस कानदुखी असल्यास कानात टाकतात. पाने केसतूट आणि कानपुळीत लावण्यासाठी वापरतात.