अमेरिकेत हिंसेदरम्यान काँग्रेसने डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यूएस काँग्रेसच्या जॉइंट सेशनमध्ये वाइस प्रेसिडेंट इलेक्ट कमला हॅरिस यांच्याही विजयाला मंजुरी देण्यात आली. काँग्रेसच्या मंजुरीनंतर बायडेन अधिकृतरित्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष झाले आहेत.
दुसऱ्या बाजूला डोनाल्ड ट्रम्प सत्ता हस्तांतरणासाठी तयार झाले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हजारो समर्थकांनी आज वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये हिंसाचार केला. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणीमध्ये अडथळे आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले. पण अखेर अमेरिकन काँग्रेसने बायडेन यांच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केलं आहे.
जो बायडेन यांचा येत्या २० जानेवारीला शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दोन आठवडयांच्या आता सत्तेचे हस्तांतरण होईल असे ट्रम्प यांनी सांगितले. सत्ता हस्तांतरणासाठी ट्रम्प तयार झाले असले तरी निवडणुकीचा निकाल मान्य नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
20 जानेवारीला अमेरिकेत नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन पदाची शपथ घेणार आहेत. पण देशात अराजकतेची स्थिती निर्माण झाल्याने 20 जानेवारीपूर्वीच कार्यकाळ पूर्ण होण्यआधीच ट्रम्प यांना पदावरून हटवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ट्रम्प यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पदावरून हटवण्याबाबत विचार सुरू आहे. अमेरिकेतील संविधानानुसार 25 व्या घटनादुरुस्तीनुसार ट्रम्प यांना त्यांचे कॅबिनेट पदावरून हटवू शकते. त्यामुळे याबाबतही विचार सुरू आहे. त्याबाबतचा निर्णय झाल्यास कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ट्रम्प यांना पायउतार व्हावे लागणार आहे. अमेरिकेतील अनेक खासदारांनी ट्रम्प यांना पदावरून तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. ट्रम्प यांनी समर्थकांना चिथावणी दिल्यानेच कॅपिटल इमारतीतील घटना घडल्याचा आरोप या खासदारांनी केला आहे.